Sanket Tambare

← Books

पट्यारा by संतोष नागो शिंदे

पट्यारा by संतोष नागो शिंदे

Author
संतोष नागो शिंदे
Category
Biography & Memoir
Language
Marathi
Year read
2026
Rating
4 / 5

एखाद्या व्यक्तीला आयुष्यात एवढं काही दुःख मिळावं, पण परिस्थितीला सामोरे जात, त्यावर फक्त मात न करता एक सुंदर विजय त्याने मिळवावा. या सर्वांमध्ये लहानपणीच लागलेली आणि प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली वाचनाची आवड, प्रत्येक टप्यावर त्याची साथ देते. एखादं लेखन खोल गर्तेतून बाहेर पडायला मदत करतं तर वाचलेला गांधी अनुभवून जगताना त्याला खरा गांधी उमगतो. आमरण उपोषणाचा प्रयोग असेल, शिक्षणाची जिद्द असेल, या सर्व प्रक्रियेतून लेखक अन्यायाविरुद्ध लढत या व्यवस्थेला समजून घेऊन बदलण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत, आधी धुळे आणि मग पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यात प्रगती करत राहतो. अंधाराचे साम्राज्य असताना त्यात एखादा उजेडाचा किरण शोधत पुढे जाण तसं अवघड पण लेखकाने हे आव्हान लिलया पेललं आहे, यात शंका नाही. ही पट्यारा लेखकाची एक पट्यारा गोष्ट तुमच्या आयुष्यातील तुमचे पट्यारापण नक्कीच जागे करेल यात शंका नाही! संतोष सरांना यापूर्वी तसे अनेक वेळा भेटलो होतो, आता ही गोष्ट वाचून, ती जिवंतपणे अनुभवता येईल, यापेक्षा वेगळी पर्वणी काय हवी!

Read the review on Canva

Tags: #पट्यारा, #marathi, #book review, #biography, #auto-biography