Sanket Tambare

← Books

त्सुबाकी स्टेशनर्स by इतो ओगावा

त्सुबाकी स्टेशनर्स by इतो ओगावा

Author
इतो ओगावा
Translator
मयुरेश कुलकर्णी
Category
Fiction
Language
Marathi
Year read
2026
Rating
4 / 5

काळानुरूप संभाषणाच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत, पण आजही ज्यामध्ये भावना पोहचवण्याची ताकद आहे, ते हे पत्राचे माध्यम!📮 जपान मध्ये एका छोट्या कामाकुरा या गावात पत्रलेखकाच काम करणारी, एक लेखिका, माणसांच्या भावना, नातेसंबंध आणि अक्षरांशी असणारे प्रेम यांचे अप्रतिम वर्णन करत आहे.💯 तात्काळ संभाषणाच्या जगामध्ये असं दिवसेंदिवस पत्राची वाट पाहत बसणं तसं वेगळं प्रस्थ!✨ त्यात ते वाचल्यावर मनात निर्माण होणाऱ्या भावना, जणू त्या निर्जीव पत्रातून तुमच्यापर्यंत पोहचतात!📬 आपल्या मनाचा ठाव घेत, आनंद असो, राग असो, आश्चर्य असो, असे सगळंच कसं अदभुतपणे दिसतं ना, या काही ओळींमधून!❤️ ग्रामीण जपानमधील आयुष्य त्यात रंगवलेली आहेत, तेथील मंदिरे, रस्ते, समुद्रकिनारे, डोंगर, भटकंती, असं सगळ एवढं सुंदर गुंफले आहे की, पुस्तक एका बैठकीतही संपेल!🏞️ मानवी जीवनात तसं एवढ्या भावनांसोबत खेळणं सोशल मीडियाच्या जगात कमीच आढळतं!💫 पण त्यात एक वेगळीच मज्जा आहे, हेही तेवढंच खरं!❣️ जणू काही, या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या आयुष्याकडे निर्धास्तपणे बघायची एक वेगळीच दृष्टी हे पुस्तक देते!🤍 नक्की वाचा!💭

Read the review on Canva

Tags: #fiction