Sanket Tambare

← Books

बाभळीच्या बाया... by वनश्री वनकर

बाभळीच्या बाया... by वनश्री वनकर

Author
वनश्री वनकर
Category
Society
Language
Marathi
Year read
2026
Rating
5 / 5

ग्रामीण राजकारण, विकास, आरोग्य, पराकोटीचे दारिद्र्य, त्यातल्या त्यात रोज आयुष्याची झगडणाऱ्या गावातील स्त्रिया! नैराश्याच्या खोल गर्तेतून बाहेर पडणं तसं अवघड. त्यातल्या त्यात, दूर कुठे जाऊन राहणे, तेथील परिस्थितीशी जुळवून घेऊन, ती समजण्याचा प्रयत्न करणे, व त्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे तसे मोठे काम. लेखिका गावात जाते काय, तेथील बायांसोबत काम करून, त्यांच्यातला आत्मविश्वास जागा करून, सर्व जाती जमातींच्या महिलांना एकत्र करून, सावित्रीबाईंच्या गोष्टी सांगते. आपसूकच त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटते, पंधरा-वीस वर्षांनी पुन्हा परीक्षा देऊन या महिला दहावी, बारावी, किंबहुना पदवी परीक्षा पास होतात. ही देवाणघेवाण एकेरी नव्हतीच, तेच शिकलेलं सर्व पुस्तकात मांडलं, हे देखील लेखिका प्रांजळपणे कबूल करते. शेवटी १०-१५ गावातील बायांनी मिळून दीड दोन हजार लोकांचा केलेला सावित्री उत्सव, आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या या बायांची गोष्ट सिद्ध करतो. असं सगळं काही आहे या पुस्तकात, नक्की वाचा!

सुंदर पुस्तक आहे, नक्की वाचा!

Read the review on Canva

Tags: #book review, #non-fiction, #social, #maharashtra