#९८७ Dear one ❤️, का उगचं आठवण काढतेयस इतकी माझी? अविरत उचक्यानी उड…
- Posted
- 2021-01-05
- Type
- text
#९८७ Dear one ❤️, का उगचं आठवण काढतेयस इतकी माझी? अविरत उचक्यानी उडवली झोप इथे माझी! बोलायचं असेल तर बोल ना? नंबर नाहीये का माझा, नसेल तर ********* यावर संदेश पाठवाशिल ना? किती दिवस असा अबोला ठेऊन त्रास देणार आहेस तू मला? “Hi” एवढे सुद्धा लिहायला एवढा वेळ लागतो आहे का तुला? अशीच काहीशी अनोळखी कोडी तरी सोडशिल का, हे तरी सांग ना? सोडवून त्यांना मागोवा नक्की घेईल मी त्यांचा! वाचलेस ना आत्तातरी, मग बोल की आत्ता? का हा अबोला न सोडण्याचा हट्ट मनी ठेवला आहेस आत्ता? माहिती आहे मला आणि कदाचित तुलाही, जरा कच्चा आहे मी नाजूक भावना ओळखताना, कदाचित मांडतानही! डोळ्यातल्या अनोळखी भावना गडद होत्या तेव्हा, दाट होते अनिष्टिततेचे धुके, माहिती आहे मला, नाही ओळखू शकलो; पण त्याची शिक्षा किती दिवस देशील सांग ना जरा? बरं बस झालं हे काव्यात्मक रंगकाम, कळलंच असेल ना काय म्हणायचंय मला? जाऊदे सोड आता, संदेश पाठवून दे ना तेवढं, किमान आठवणीच्या उचक्या तरी बंद होतील म्हणा! ~संकेत सकाळी पण उचक्या थांबत नाहीयेत राव!🤦♂️ #५:१:२०२१::५:११:am