#1050 #अशीच_एक_छोटीशी_गोष्ट तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल! =======…
- Posted
- 2021-02-27
- Type
- photo
#1050 #अशीच_एक_छोटीशी_गोष्ट तुमची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल! =========================== हो, कदाचित स्वतः मध्येच हरवलोय मी! Insta च्या झगझगाटीपासून, Facebook च्या कलकलाटापासून, होय कलकलाटच म्हणेन मी त्याला, सोशल मीडियाच्या लुकलुकणाऱ्या जगापासून, खूप लांब भटकत आहे मी! FOMO ही आहे म्हणा थोडासा, Fair of missing out हो, पण सवय झालीय थोडीशी आता, कधीकधी भटकतो त्याच तारांकित मायावी सोशल मीडियाच्या मोठमोठ्या शहरांमध्ये, मांडली आहेत दुकाने जिथे सर्वांनी आपली, काही विकण्यासाठी नाही, कदाचित मोकळा वेळ छळत असेल, कदाचित इतरांपासून तुटण्याची भीती असेल, म्हणून…! सगळेच मग्न आहेत, followers, visitors, likes च्या गुंत्यामध्ये, टाइमपास नव्हे टाईम “पास” करण्यासाठी तेवढेच एक साधन असावे!!! बाकी सगळे सोडा, मी मात्र मग्न आहे, स्वतः च्याच छोट्याश्या Tumblr च्या बेटावर, पण खरं सांगू, इतके सोपे ही नाहीये हे, असे एकटे एकटे राहणं, त्या समाज प्रवाहाविरुद्ध झगडण, पण म्हणतात ना, what matters most at the end of the day, only that thing should matter the most , whole day! Priorities चा खेळ सारा, जाणिवांच्या प्रगल्भतेवर टिकून राहण्याची धडपड, बाकी काही नाही!!! होय ना? ~संकेत #१२_वाचताची_डायरी #२७:२:२०२१:१२:१२:am
Tags: #social media, #digital detox, #marathi, #digital wellbeing