Sanket Tambare

← Micro Blog

#११०३ #SomeStoriesImaginaryOne’s माहिती आहे मला, माहिती आहे मला, चं…

Posted
2021-04-25
Type
photo

#११०३ #SomeStoriesImaginaryOne’s माहिती आहे मला, माहिती आहे मला, चंद्रही आज मूड मध्ये जरा, दूर असलेल्या न उमगलेल्या, व्याकुळ उत्कट मनातील कनेक्शन, spin up करायचा प्रयत्न करत असेल म्हणा! पण एक सांगू, त्याच उचक्यांनी उडवली आहे झोप माझी इथे, तुझे काय सांगशील ना? त्यावरच लिहिल्या होत्या काही ओळी, त्याच व्यक्त करेन पुन्हा, त्याच व्यक्त करेन पुन्हा! फक्त एक करशील, तेवढं आठवण काढून, इथे मला त्रास देणं बंद करशील ना? ========================= Dear one ❤️, का उगचं आठवण काढतेयस इतकी माझी? अविरत उचक्यानी उडवली झोप इथे माझी! बोलायचं असेल तर बोल ना? नंबर नाहीये का माझा, नसेल तर ********* यावर संदेश पाठवाशिल ना? किती दिवस असा अबोला ठेऊन त्रास देणार आहेस तू मला? “Hi” एवढे सुद्धा लिहायला एवढा वेळ लागतो आहे का तुला? अशीच काहीशी अनोळखी कोडी तरी सोडशिल का, हे तरी सांग ना? सोडवून त्यांना मागोवा नक्की घेईल मी त्यांचा! वाचलेस ना आत्तातरी, मग बोल की आत्ता? का हा अबोला न सोडण्याचा हट्ट मनी ठेवला आहेस आत्ता? माहिती आहे मला आणि कदाचित तुलाही, जरा कच्चा आहे मी नाजूक भावना ओळखताना, कदाचित मांडतानही! डोळ्यातल्या अनोळखी भावना गडद होत्या तेव्हा, दाट होते अनिष्टिततेचे धुके, माहिती आहे मला, नाही ओळखू शकलो; पण त्याची शिक्षा किती दिवस देशील सांग ना जरा? बरं बस झालं हे काव्यात्मक रंगकाम, कळलंच असेल ना काय म्हणायचंय मला? जाऊदे सोड आता, संदेश पाठवून दे ना तेवढं, किमान आठवणीच्या उचक्या तरी बंद होतील म्हणा! ~संकेत #उचक्या #मन #कनेक्शन #Lets_just_spin_it_up_like_the_instance in cloud! I know क्रेडिट जरा कमी आहे माझ्याकडे, पण तेवढं adjust करशील ना? #…??? #SankyWrites #SomeMorningsImplyingOnes #25:4:2021::6:06:am

Tags: #marathi, #love, #nightsky