Sanket Tambare

← Micro Blog

#११३५ “जब कोई राजा अपने कर्तव्य पालन में असफल होता है तब ऐसा होता ह…

Posted
2021-05-21
Type
quote

#११३५ “जब कोई राजा अपने कर्तव्य पालन में असफल होता है तब ऐसा होता है, अकाल मृत्यु बढ़ती है, पाप बढ़ता है और चारों ओर अव्यवस्था फैलती है” #विचार_तर_कराल✊ बरेच दिवस झाले, खूप काही पाहात आहे, खूप काही ऐकत आहे, कधी कधी प्रश्न पडतो, एवढं सगळं होऊनही, किंबहुना होत असताना देखील, सगळं कसं ठीक आहे, असे काही जण का वागतायत? सगळं काही ठीक आहे, सरकार सगळं काही व्यवस्थित करत आहे आणि या व्यवस्थेला, आणि व्यवस्था म्हणजे काय आहे इथे, “सरकार"च ना, प्रश्न सुद्धा विचारू नयेत? का? आणि, प्रत्येक गोष्टीत इतिहासाचे दाखले देणं थांबवा, it’s just irritating! अजूनही जर ही माझी चूक आहे, हे मान्य करायला जे तयार नाहीत, ते परिस्थितीला बदलणे…, बदलणे सोडा, त्यांना खऱ्या. परिस्थितीची जाण आहे की नाही, हाच प्रश्न पडतो? आपण प्रश्न विचारायचेच नाहीत, कारण उत्तरे कधी मिळणारच नाहीत, हे स्वीकारून सगळे सोडून द्यायचं का? वणवा लागला असताना, वणवा लागला आहे म्हणून आपण काही करू शकत नाही, म्हणून शांत राहणेच योग्य?, त्यापेक्षा वणवा विझवण्याचा प्रयत्न आपल्या चोचीतील पाण्याने करण्याचा प्रयत्न करणारी चिमणी योग्य, किंबहुना आपण काय करत आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याइतपत प्रगल्भ नक्किच आहोत, असे वाटतो. आता वणवा लागलेलाच नाही, असे जर काही जणांना वाटत असेल तर गंगेच्या किनाऱ्यावरील आणि पाण्यातील दृश्य पाहून घ्यावी, एवढीच विनंती! आणि, या सर्वांतून एक कॅटेगरी आहेच, *अंध- भक्त*, you know whom I am referring to right? टिप्पणी च्या भाषेत सांगायचे झाले तर, धृतराष्ट्र- संजय संवादामध्ये, धृतराष्ट्र विचारतो, डंकापतीच्या राज्यात सर्व कुशल- मंगल? संजय थोडा थांबून म्हणतो, स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, महाराज आणि डंकापती म्हणा किंवा नेरो म्हण, आपला महाल बांधण्यात व्यस्त आहे. आज तो रडला की रडण्याचे नाटक केले, हे जाणत्या व्यक्तीला ठाऊक आहेच, पण देशातील गोदी मीडियाला लक्ष विचलित करण्यासाठी अजून एखादा विषय देण्याशिवाय, याचे प्रयोजन दुसरं काहीही नाही, एवढं मात्र नक्की! थोडक्यात, रोम शहर जळत होत. त्या आगीने उजळून निघालेल्या महालात राजा nero नाच गाण्यात मग्न होता. शहर जळत असल्याबद्दल ना त्याला काही फिकीर होती, ना त्याच्या मनात या प्रश्नाला कसे सोडवता येइल, याविषयी काही प्लॅन. कारण त्याला वाटत होतो, आपल्याला इथे पर्याय नाही! हेच सत्य आहे! पण हळूहळू जाणीव निर्माण होत आहेत, हीच एक आशादायी बाब!✊ #मनातलं #२१:५:२०२१::९:२१:pm

Tags: #youtube, #politics, #marathi