Sanket Tambare

← Micro Blog

#1309 #३_am_डायरी #स्थितप्रज्ञता आयुष्यातल्या कैक वळणावर अनेक क्षित…

Posted
2023-03-20
Type
text

#1309 #३_am_डायरी #स्थितप्रज्ञता आयुष्यातल्या कैक वळणावर अनेक क्षितिजं खुणावतात! त्या रस्त्यांवर अनेक अडथळे ही नक्कीच असतात! निर्णय आणि प्राधान्यता यांची गोळा-बेरीज मात्र, दिसते तितकी सोपी नसते, एवढं मात्र नक्की! या वळणांवर अनेक वैविध्यपूर्ण व्यक्ती देखिल भेटतात! काही जुळतात, काही आणखी घट्ट जुळतात, आणि काही जुळतही नाहीत! यापैकी किती काळाच्या ओघात टिकतात ही गोष्ट वेगळी पण, एका टप्प्यावर जाऊन पुढच्या लक्षाचा मागोवा घेण्याचा प्रक्रियेत जेव्हा मागील सर केलेल्या अंतराची जाणीव होते तेव्हा संतुष्टता, कृतज्ञता, अशा अनेक भावनांचे दाट धुके मनात घर करतं. उगीचच मागच्या आठवणींच्या कप्प्यात अडकायचे की समोर खूनावणाऱ्या अनंत शक्यता पडताळायाच्या, हे द्वंद्व स्वाभाविक आहे. आजुबाजूच्या घटकांकडे कितीही दुर्लक्ष केले तरी ही चाकोरीबाहेरची वाट चालताना, त्याचा थोडा का होईना विचार होतोच! शेवटी त्या स्थितप्रज्ञ बुद्धासारखे होण्यासाठीच हा सारा घाट! त्यात स्थैर्य, संयम, नियंत्रण, त्याग, स्वत्व, आणि अशाच गुणांच्या साहाय्याने ही अडथळ्यांची शर्यत, योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन पळत राहायचं, एवढं मात्र नक्की! आणि, आज कालच्या एकाकलेल्या, न्यूनात्वाची भावना निर्माण करून, खोल गर्तेत घेऊन जाणाऱ्या, सामाजिक माध्यमांवर राहूनही त्या स्थितप्रज्ञ स्थितीत राहण्यासाठीच घातलेला हा वैचारिक अट्टाहास, बरोबर ना? #२०:०३:२०२३::०३:०५:am

Tags: #स्थितप्रज्ञ, #marathi, #self-reflection, #मन