#1321 #1_am_diary! #some_things_enriching_ones अशा खूप कमी गोष्टी अ…
- Posted
- 2023-06-04
- Type
- photo
#1321 #1_am_diary! #some_things_enriching_ones अशा खूप कमी गोष्टी असतात, ज्यामध्ये गुंतलो की व्यक्ती स्वत्व विसरतो, दैनंदिन जीवनातील गोष्टी जणू काही विलुप्त होतात, गुंतलेल्या मनाला वेळेची जाणीव राहत नाही. आणि, त्यातून बाहेर पडलं की, मन प्रफुल्लित होते, एक नवी ऊर्जा, उमेद, कुठेतरी मनात घर करते. काहीतरी अर्थपूर्ण करण्याच्या प्रक्रियेत बहुदा हेलकावे घेणारे मन, यांनतर मात्र निश्चल होऊन, गोष्टी सोप्या करतं. आजची ही अशीच एक गोष्ट, बेधुंद होऊन, अभंगाच्या तालावर रमलेले मन, कानात पडणारा उत्साही आवाज आणि वातावरणात निर्माण झालेली ती ऊर्जा! #04:06:2023::01:10:am
Tags: #marathi