#१३२९ #तत्वनिष्ठता तत्वनिष्टतेची कसोटी तशी अवघडच! स्वतःतल्या स्वत्व…
- Posted
- 2023-08-04
- Type
- photo
#१३२९ #तत्वनिष्ठता तत्वनिष्टतेची कसोटी तशी अवघडच! स्वतःतल्या स्वत्वाला परिपूर्ण करते ती तत्वनिष्टता! मोठ्या लोकांचे सानिध्याची जोड लागली तर विफळ वाटणारी ही निष्ठा तुलनेने परिणामकारक आणि अर्थपूर्ण बनते. या धावपळीच्या आभासी जगात बऱ्याच गोष्टी मागे पडतात, निष्टेच्या मागे जाऊन काहीतरी करण्याचा निश्चय पाळणे तसे अवघडच! पण याला खऱ्या अर्थाने बळ देतो तो काही कर्तृत्वाने मोठ्या आणि विनम्र लोकांचा सहवास. स्थितप्रज्ञतेच्या कसोटीत झुंजून तासलेले मन एकाग्र तर होतेच पण खऱ्या अर्थाने शास्वत गोष्टींचा ध्यास घेते. तात्पुरत्या गोष्टींचा मोह सुटतो. चलबिचल मन शांत होते. #०४:०८:२०२३::१०:४५:pm
Tags: #marathi, #स्थितप्रज्ञ, #self-reflection