Sanket Tambare

← Micro Blog

#१३३२ आयुष्यावर बोलू काही…! २० वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमा…

Posted
2023-08-06
Type
photo

#१३३२ आयुष्यावर बोलू काही…! २० वर्षांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमाविषयी बोलताना कवी म्हणतात, टिळक रोड वर अगदीं ४ गाड्या होत्या तेव्हा याला सुरुवात झाली, आज हजारो आहेत, पण त्यापेक्षा सुदंर हा प्रवास आहे! प्रेम, आशा, निराशा, आई, बाबा, आजोबा, ध्येय, ब्रेकअप इथपासून सामाजिक, भावनिक, राजकीय कवितांची एक अदभुत मंडियाळी! बेधुंद हास्य, मध्येच कोणाच्या आठवणीत हळवे होणारे ते मन, हृदयाच्या ताऱ्याना स्पंदनाऱ्या त्या कविता, काय बरं चालेलल असेल आजी - आजोबांच्या मनात ही उलगडणारी पद्य, आणि प्रत्येक गाण्यात, प्रत्येक कवितेत हजारो रसिकांच्या मनाला नुसतं धरून नाहीं तर झुलवणारी ही गाणी! ६ तास भरपूर वेळ असतो, पण अगदी शेवटपर्यंत फर्मैशी संपत नाहीत असे हे काहीसे मॅजिकल सहा तास! वेगळ्या वाटेने पहुडून मराठी कवितांना एक वेगळ्या उंचीवर नेणारी ही मेहफिल, यातील काही ओळी “तिला मी बघितलं जितकं तितके कुणीही बघितलं नाहीं, अज्ञानात सुख असतं…”, “गाडी सुटली, भोवतालच्या कल्लोलाचे ओझे झाले, थेंबाइतके अंतर होते, दर्याईतके मोठे झाले ”…! आयुष्य खूप सुंदर आहे. आजूबाजूच्या कल्लोळात गुंतून मन अकसते, सुस्तावते कधी कधी ओशाळून जाते! अशा वेळी गरज असते एका आशेच्या गोळीची, अगदीं तसच काही याच आहे! मनाला समृद्य करत, कळत - नकळत त्यावरील अडगळलेळे जाळी काढण्याचं काम हे करतं! पुनःप्रफुल्लित मन नव्या ऊर्जेने उद्याकडे पाहते, काय चुकलं, काय राहिलं, काय केलं आणि काय अनुभवायंच राहिलं यासोबतच उद्याच्या सुंदर दिवसात मी काय काय करणारं हे देखील मनात नक्कीच रुजत! थोडक्यात आयुष्याच्या पटलावरच दृश्य दाखवत दाखवत मन, आयुष्य यांना समृध्द करणारी ही एक सुंदर मेहफिल! #०६:०८:२०२३::०९:५२:am

Tags: #marathi