#१३३७ स्वातंत्र्यदिन चिरायु होवो! स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याल…
- Posted
- 2023-08-15
- Type
- photo
#१३३७ स्वातंत्र्यदिन चिरायु होवो! स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याला मिळविण्यासाठी किती झटावे लागले, कोण झटले, कोण झटल नाही, आपण आज खरंच स्वतंत्र आहोत का, जो इतिहास सांगितला जात आहे तो खरा आहे का, आणि नसेल तर ते कोण पसरवत आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांवर विचार करत नसाल तर विचार करण्याची आणि करत असाल तर निर्भिडपणे प्रकटपणे तो मांडण्याची सुरुवात करण्याचा हा दिवस! व्यक्ती, धर्म, विचार, कर्म, माहिती, सामाजिक इ. अशा अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यावर जरी गदा आली असली तरीही याच्यावर गदा आणणारे सरकारच जर स्वातंत्र्याचा अविर्भाव निर्माण करत आहे, तर हा एक विरोधाभासच नव्हे का? आपण सर्व विवेकी आहोत, सुज्ञ आहोत, स्वतः साठी, देशासाठी चांगलं-वाईट कळण्या-इतपत प्रगल्भ आहोत याची मला जाण आहे, पण सध्या गरज आहे, या जाणीवा वृद्धिंगत करण्याची, आपल्या आप्तेष्टांना त्यासाठी प्रोत्साहित करण्याची आणि बोथट झालेल्या या भावनांना धार देण्याची! बाकी आपण सर्व जाणता, फक्त मानायला सुरुवात तरी करा! #१५:०८:२०२३::०१:२७:am