Sanket Tambare

← Micro Blog

#१३३९ #मन आयुष्याच्या अडगळीत अडकलेले मन कशात रमत नाही. इंस्टाच्या र…

Posted
2023-08-27
Type
photo

#१३३९ #मन आयुष्याच्या अडगळीत अडकलेले मन कशात रमत नाही. इंस्टाच्या रीलपासून ते अशाच कसल्यातरी गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करते. मन रमावयला लागते एक अनाम ओढ. अशाच एखाद्या प्रगल्भ गोष्टीच्या मागे लागलेले मन अडकळत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थाने इंस्टाग्राम मध्ये अडकलेले लक्ष सोडवायचे असेल तर किमान एक तरी अशीच एखादी अनाम ओढ जपावी. कदाचित Purpose वगैरे यातूनच येत असावा! #२७:०८:२०२३::०२:०९:am

Tags: #marathi, #मन, #social media, #digital wellbeing