#1340 #स्थितप्रज्ञ-मन कधी कधी मन उत्साही असतं, कधी आशादायी, कधी नव-…
- Posted
- 2023-08-27
- Type
- text
#1340 #स्थितप्रज्ञ-मन कधी कधी मन उत्साही असतं, कधी आशादायी, कधी नव-उत्साहाने प्रफुल्लित, कधी कोणाच्या आशेने न्हालेले, कधी थोडेसे हिरमुसलेले; सकाळी प्रफुल्लित, दुपारी थोडासा ओशाळलेल, संध्याकाळी किनारी शांत तर रात्री या सगळ्या कल्लोळात न्हाऊन शेवटी शांत निजणारे मन! एकंदर काय तर या साऱ्या खेळात दमतो तो माणूस! मग या खेळात रमायचे का नवे कोडे उलगडायचे ते त्याचे त्याने ठरवावे! यात गुंतण्यातच खरी मजा ही गोष्टही तितकीच खरी म्हणा! अशा प्रगल्भतेच्या उपदेशानी सज्ज मन एका वेगळ्याच ऊर्जेने जागते, आणि The Big Pictureची जाणीव त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते! मग क्षुल्लक गोष्टींचा मोह टाळला जातो, उगीचच कुठे भरकटत नाही, आणि स्थितप्रज्ञतेच्या कसोटीस पात्र ठरते! #२७:०८:२०२३::०२:१२:am
Tags: #स्थितप्रज्ञ, #मन, #marathi