#१३४१ आयुष्यात अनेक बंध जुळतात, कधी कळत-नकळत, कधी प्रयत्नपूर्वक! या…
- Posted
- 2023-08-31
- Type
- text
#१३४१ आयुष्यात अनेक बंध जुळतात, कधी कळत-नकळत, कधी प्रयत्नपूर्वक! या ऋणानुबंधाची ओढ दोन्ही टोकाला वेगळीच! यात अपेक्षांची जुळवा-जुळव केली तर गोष्टी आणखीनच क्लिष्ट! कैक वेळेला अशी समीकरणे न जुळलेल्या बंधनामध्ये वेळेची आणि मनाची गुंतवणूक व्यर्थ तर ठरतेच पण त्यातून उलट त्रासच जास्त होतो. रात्री वैफल्यात अशी अनेक समीकरणे सुटतात, कळतात आणि कदाचित जुळतात देखिल! फक्त गरज असते हा गुंता सोडवण्याची! #३१:०८:२०२३::१२:१७:am
Tags: #marathi, #self-reflection