#१३४२ #आयुष्य आयुष्याच्या सुंदर अडगळीत, जस एखाद्या कपाटात सजवून ठेव…
- Posted
- 2023-09-02
- Type
- text
#१३४२ #आयुष्य आयुष्याच्या सुंदर अडगळीत, जस एखाद्या कपाटात सजवून ठेवल्यासारखे काही क्षण, काही आठवणी असतात. कधीकाळी तत्सम निवडीमुळे काही सुंदर गोष्टी घडल्या असाव्यात. काही नावच घ्यायची म्हटलं तर, सुरुवातीच्या काळात media cell, त्यानंतर vivekvahini, ज्यामुळे मी हजारो लोकांपुढे बोलायला मिळाले आणि सामाजिक जाणिवेची ज्याने खऱ्या अर्थाने पेरली ते अंनिस, त्यातच SAC, आणि ज्याची बहुमोल ओळख झाली ते निर्माण! खरंतर या प्रत्येक ठिकाणी तन्मयतेने काम करणारे अनेक खास मित्र वगैरे बनले, पण एक वाटतं, हळूहळू हा परीघ वाढत गेला, आज त्याच्या व्यासात अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्यातूनच कधी designing, blogging, editing तर कधी writing ची सवय लागली असावी! एक खंत किंवा एक चांगली गोष्ट म्हणा, कुठेच हे मन अडकले नाही. कालांतराने काही बंध सुटले, काही काळाच्या ओघात विरले, काहींच्या दिशा बदलल्या, काहींची लांबी तितकीच असावी कदाचित; पण खूप सुटले, खूप झुरले, अनेक स्फुरले आणि काही खूप सुंदर बहरले; सुटलेल्यांचा, झुरालेल्यांचा विचार येत नाही असं नाही, पण तुटलेलं बंध जुळणे इतकेही सोपे नाही हेही खरे! कदाचित या उस्फुरलेल्या मनाला वेगळीच अनाम ओढ असेल, कोण जाणे! आता तेव्हा जे केलं त्याने बरंच काही दिलं, ते बरोबर की चूक हा प्रश्न इथे नाहीच, पण एक ओझ असतं ना, हुशार होता, काहीतरी मोठं नक्की केलं असतं, हे करून याचं चुकलंच! कळत नकळत जाणिवेची भावना मनात रुजल्या मुळे या गोष्टी घडल्या असतीलही! विस्तारलेल्या परिघाच्या सीमा विस्तारायला जरा एखाद्या मोठ्या गोष्टीची ओढ लागते, हेही तितकंच खरं! आता ती ओढ तेवत ठेवण्यासाठी जे लागेल ते करतं राहणं हाच एकमेव मार्ग! #०२:०९:२०२३::०१:५५:am
Tags: #marathi, #life, #nirman, #scientific temperament