#१३४३ #नाटक _समीक्षा एखाद्या कलाकाराने लिखाणात एवढं प्रावीण्य मिळवा…
- Posted
- 2023-09-17
- Type
- photo
#१३४३ #नाटक _समीक्षा एखाद्या कलाकाराने लिखाणात एवढं प्रावीण्य मिळवावं की ती कथा जणू आपल्याला बोट धरुन दाखवत आहे असं वाटावं! नाटक म्हणजे काय हो? क्लिष्ट दिसणाऱ्या आयुष्याकडे एखाद्या त्रयस्थ नजरेने बघण्याची दृष्टी देणारी एक अदभुत गोष्टच! रंगमंचावर नाटक चालू असतं खरं, पण त्यानंतर मनातल्या पटावर चालू होते आपल्या आयुष्यातील नाटक! यातलं नायक आपण असतो खरं, पण कधी हे आपल्या भोवतीच फिरत आहे ना हा प्रश्र्न देखिल पडतो! त्यातच भर पडत असते ते जुन्या नव्या कथानकांची, यातलं कोण permanent आणि कोण temporary हे प्रश्र्न पडतातच ना? खरं तरं Permanent नसतं कोणी, हेही तितकंच खरं! तर असं हे नाटक आपलं खरे प्रश्र्न, व्यथा, पेच प्रसंग अगदी नकळत सोडवत आणि हे सुटलं हे आपल्याला जाणवत देखिल नाही. आणि विशेषतः रात्री अपरात्री म्हणजे कसं १-२ वाजता पडतात ना ते प्रश्र्न, यात अलगदच सुटतात! असंच काहीसं हे “असाही एक कलावंत!” हे नाटक! मानवी भावना, क्रिया, प्रतिक्रिया, समाज, स्त्री, खरे सौंदर्य, अशा विविधांगी विषयाला गुंफत फक्त अभिनयाच्या जोरावर व्यक्त झालेले “A man called…” हे मौन नाटकं! अत्यंत कमी नैपथ्यामध्ये फक्त हालचालींनी आभासी गोष्टी दाखवत कथानक एक अतिशय सुंदर संदेश यातून देते! #१७:०९:२०२३::१२:५२:am
Tags: #marathi