#1246 दूर कोण्या कपारीवरी, दडला आहे तो सूर्य एक! शोधत शोधत दमलेल्या…
- Posted
- 2023-10-14
- Type
- text
#1246 दूर कोण्या कपारीवरी, दडला आहे तो सूर्य एक! शोधत शोधत दमलेल्या मनात, प्रश्नच येतायत कैक! शंकांचे या झाले आहेत, वाटोळे अनेक! असच अलगद सुटतो जेव्हा प्रश्र्न एक, दुसरा गुंतूनी गुंफत राहतो कोडे कैक! निश्चल समयी अशाच एका सायंकाळी, दिसते ती कपारी दुर अडोशासी एका! मग बेफिकीर पावले चालती, त्या वाटा असेच सैरभैर होऊन जरा! दिन-रात्री करतं प्रवास पोहचे त्या कपारी देह हा, सुंदर उषकाली मुठीत दिसणाऱ्या नव्या क्षितिजाला धुंडाळत राही मुसाफिर हा! #14:10:2023::12:43:am