Sanket Tambare

← Micro Blog

#१२४७ एक एकटा, शोधत राही, एक एकटा, हरवून जाई! एक एकटा, सावरे तरी, ए…

Posted
2023-10-27
Type
text

#१२४७ एक एकटा, शोधत राही, एक एकटा, हरवून जाई! एक एकटा, सावरे तरी, एक एकटा, हरखून पुन्हा त्या निश्चल वाटेवरी येई! एक एकट्याचे, चक्र चाले सदा असे, एक एकटा, परी भटकत भटकत त्या अपुल्या कळपात जाई! एक एकट्याला, कळप ना मिळे इतुक्या लवकर, एक एकटा, मग स्थितप्रज्ञ होऊनी त्या वाटेवर एकटा चालत राही!! #२७:१०:२०२३::०१:५०:am

Tags: #marathi, #स्थितप्रज्ञ, #self-reflection