Sanket Tambare

← Micro Blog

#१२६२ #प्रवास नेहमी काहीतरी नवीन देतो, नवीन व्यक्ती भेटतात, नविन मा…

Posted
2024-02-26
Type
text

#१२६२ #प्रवास नेहमी काहीतरी नवीन देतो, नवीन व्यक्ती भेटतात, नविन माणसं भेटतात, आजूबाजूच्या लोकांकडे बघण्याचा एक वेगळा अनुभव मिळतो. खरंतर स्वतःला comfirt झोनच्या बाहेर पडण्याची एक संधी मिळते. मी नेमक काय करतं आहे, याचं कळत नकळत अवलोकन होते. काहीं गोष्टींना, लोकांना आपण मोठं करतो ज्या क्षुल्लक असतात, तर काहीं गोष्टींचा कधी विचारच करतं नाही, ज्या कदाचित महत्त्वाच्या असतात. रोजच्या चौकटीबाहेर पाहायला तस कधी संधीही मिळत नाही म्हणा. समृद्धतेच्या व्याप्ती वाढवत, एक समग्रदृष्टीने सर्व गोष्टींकडे पाहण्याची मजा काहीं औरच! Temporary कोण आणि permanant कोण, खरंच एखाद्या गोष्टीला एवढं वेळ द्यायची गरज आहे काय, याचे अवलोकन होऊन काहितरी मनात ठरतं! असो, या सर्वाची एक वेगळीच मजा! #सफर #२६:२:२०२४::१०:१९:am

Tags: #travel, #marathi, #self-reflection