Sanket Tambare

← Micro Blog

#1279 धार्मिक उन्माद वाढतोय. ढवळलेल्या वातावरणात, माहितीच्या भडिमार…

Posted
2024-04-17
Type
text

#1279 धार्मिक उन्माद वाढतोय. ढवळलेल्या वातावरणात, माहितीच्या भडिमार सुरू आहे. इतक्या बिघडलेल्या वातावरणात खरंच एखादं विवेकी मन नक्कीच निराश होईल. जॉर्ज ओरवेल ने सांगितलेली ministry of truth, fact check unit च्या रुपात येऊ पाहत आहे. नागरिकांना electoral bond च्या माहितीची जाणून घेण्याचा अधिकार नाही पण, सरकारला नागरिकांच्या पैशापासून, त्यांचे आरोग्य, प्रवास, शिक्षण या सर्वाची एका ठिकाणी माहिती हवी आहे, थोडक्यांत एक centralised surveillance system, जस सध्या चीन मध्ये आहे. १९४७ साली एका दीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यात ज्या लोकांनी माफिनामे लिहून शरण गेले त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेरोजगारी, महागाई, वातावरणीय बदल, त्यामुळे होणारा अवकाळी पाऊस, बदलते तांत्रिक जग आणि त्याचे एकूणच जनजीवन, नोकर्यांवर होणारे परिणाम, असे अनेक प्रश्र्न असताना, दुर्दैवाने यापैकी एकाही प्रश्नांवर चर्चा होताना दिसतं नाही. तर दिसतं काय, धर्म, वेज, नॉनव्हेज, कोण किती antinational, वगेरे वगेरे भरकटलेल्या चर्चा! जनमानसात बदल घडवून आणण्याची क्षमता असते, पण आज तसे काही दिसतं नाहीये, थाळी वाजवणारे लोक, बेधुंद नाचणारा बेरोजगार तरुणवर्ग, आजूबाजूला घडत असलेल्या घटनांची जान नसलेले व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये अडकलेले काही भक्त, हा अंधभक्तच! बदलाचे वारे दिसतं आहेत, गरज आहे त्याला शक्ती देण्याची, त्याच्यासोबत जाण्याची, वैचारिक वारसा जपण्याची आणि पूढे नेण्याची! निवडणुका येत आहेत, लोकशाहीचा उत्सव येत आहे, त्यामध्ये आपल्या वैयक्तिक, सामजिक आणि राष्ट्रीय भविष्याचा विचार करून, आपले मत देण्याची! #17:4:2024::12:44:pm

Tags: #politics, #marathi, #privacy, #digital manipulation