#१३०० #Independence #स्वातंत्र्य एक साधा शब्द, आज तोच दिवस, स्वातंत…
- Posted
- 2024-08-15
- Type
- text
#१३०० #Independence #स्वातंत्र्य एक साधा शब्द, आज तोच दिवस, स्वातंत्र्य दिन! खरंच तो इतका साधा, सरळ आहे का? आपल्याला तो खरंच समजलंय का? बंधनात गुरफटलेल्या आपल्या आयुष्यात स्वतंत्र असणं, म्हणजे काय, याची जाणीव म्हणणाऱ्याला खरंच असते का? तसं त्यालाही विविध पैलू आहेतच ना, वैचारिक, शारिरीक, मानसिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, वगैरे, वगैरे! सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या गर्तेत अडकलेल्यांना याची जाणिव आहे का? मनाला हलवून टाकणाऱ्या अनेक घटना आसपास घडत आहेत, जास्त मागे कशाला, कुस्तीमध्ये लैंगिक छळ होऊन देखील ऑलिम्पिक सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी विनेश असेल, आपला हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी, शेतकरी असतील, मणिपूर तर आपल्या देशातच आहे ना? तिथल्या लोकांचे स्वातंत्र्य आहेच की, अगदी काल परवा झालेला कोलकत्ता मध्ये एका स्त्री डॉक्टरांचा हिरावून घेतलेला स्वातंत्र्य असेल, अनेक उदाहरणे आहेत. प्रश्न हा आहे, की आपल्याला याची जाणीव आहे का? छोटासा धार्मिक भडकाऊ पोस्ट ने पेटनाऱ्या तरुणाला या सर्वाची जाणिव असेल काय? की या आधुनिक डिजिटल जगात त्याच्या या जाणिवांचे स्वातंत्र्य देखील त्याच्यापासून हिरावून घेतलेल आहे? कदाचित असेलही, प्रश्न आहे आपण काय करतोय? या सर्व गोष्टींविषयी विचार करतोय का आणि नसेल तर कधी सुरू करणार आहोत? स्वतःच्या पलीकडे जाऊन आसपास समाजात भेडसावणाऱ्या या स्वातंत्र्याच्या प्रश्नांविषयी आज किंवा उद्या विचार तर नक्कीच करावा लागेल ना! आणि जेव्हा बहुसंख्य या गोष्टींचा विचार करतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य होऊ का? ~संकेत #१५:०८:२०२४::१०:३६:am
Tags: #marathi, #politics, #social media