#1308 प्रसन्न पहाटे सकाळी अलगद उमलतो रवी जरी, शांत संध्याकाळी तेवढा…
- Posted
- 2024-11-18
- Type
- photo
#1308 प्रसन्न पहाटे सकाळी अलगद उमलतो रवी जरी, शांत संध्याकाळी तेवढाच मोहक वाटे तोही! जंजाळात या जसे अडकतो व्यक्ती कोणी, तसाच काहीसा दिवसभर असूनही स्थितप्रज्ञ होई सायंकाळी तोही! कोण आपले, परके कोणी, ध्येय कुठले, जायचे कूठे, प्रश्न जरी असतील अनेक, अनुत्तरित बरेच जरी! अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत बसले की, निपचित एका कोपऱ्यात ते सर्व पडून राही! तैलचित्र जरी वाटे सुन्दर, मोहक तितकेच दुरून कितीही, त्याच्या वेदना तो सतत जळणारा सूर्यच जानी! अशाच काहीशा सायंकाळीं, एक जीव निपचीत शांत स्थितप्रज्ञ होई!! ~संकेत #१८:११:२०२४::१०:३८:pm
Tags: #marathi, #स्थितप्रज्ञ