Sanket Tambare

← Micro Blog

#1320 २०२० मधील भारत हे एक स्वप्न ए पी जे अब्दुल कलाम यांनी किंबहून…

Posted
2025-04-25
Type
text

#1320 २०२० मधील भारत हे एक स्वप्न ए पी जे अब्दुल कलाम यांनी किंबहूना सबंध देशाने पाहिले होते. आपण २०२५ मध्ये आहोत. आता २०३५, २०७० मधील भारताविषयी स्वप्न दाखवली जात आहेत. स्वप्न दाखवणे नक्कीच चुकीचे नाही, पण त्याच्या अगदी विरुद्ध कृती दिसत असेल आणि तसे दाखवण्याचा प्रयत्न सरकार, मीडिया करत असेल तर ही शोकांतिका नव्हे का? धार्मिक उन्माद, मीडिया control, बेरोजगारी, उद्याचे AI चे जग, क्लायमेट change, GDP, per capita income, चीनचा वाढता प्रभाव, Geo-politics, आहे असे एक नाही किंबहूना हजारो प्रश्न पुढे आहेत. प्रश्न हा आहे, की आपण काय करणार आहोत? खरंच आजुबाजूला काय चालू आहे ते डोळस नजरेने पाहणार आहोत का? आपल्या भविष्याचा आपण वेध घेणार आहोत का? बोलण्यासारखे बरंच आहे, सध्या एवढच! #२५:०४:२०२५::०८:५८:am

Tags: #marathi, #politics, #ai