Sanket Tambare

← Micro Blog

#1331 खंडेराव, सावल्यांचाच खेळ सर्व! त्याचे असे की, चेहरा दिसत नसला…

Posted
2025-07-18
Type
photo

#1331 खंडेराव, सावल्यांचाच खेळ सर्व! त्याचे असे की, चेहरा दिसत नसला तरी, त्या आठवणी, आपोआपचच मनात दाटून येतात. मग त्या क्षणी त्या फोटोच्या पलीकडे जाऊन विचार होतो. त्यात जास्त रंगही नाहीत, पण ते चित्र मनाच्या पटलावर नक्कीच एक सुंदर चित्र उमटवत. भावना जरी उत्कटतेने दिसत नसल्या तरी, त्या त्या क्षणी काय असतील याची जाणीव नक्कीच होते. म्हणून सावलीवरून माणसं ओळखता येतील, अशी माणसं आयुष्यात असली की, अजून काही लागत नाही! ते तुमच्या मनातले रंग, भावना न बोलता ओळखतात, बाकी काय हवं असतं या निरागस मनाला! #१८:०७:२०२५::०९:३७:am

Tags: #खंडेराव, #marathi