Sanket Tambare

← Micro Blog

#१३३८ मनाच्या पटलावर खरंच मनाची खोली गाठायची असेल, तर आभासी स्तरांच…

Posted
2025-09-01
Type
text

#१३३८ मनाच्या पटलावर खरंच मनाची खोली गाठायची असेल, तर आभासी स्तरांच्या पलीकडे जावे लागते. एखादी गोष्ट किती निष्ठेने आणि किती काळ करू, याची बीजे त्याची प्रेरणा मनाच्या किती आत दडलेली आहे, यावर ठरते. सतत मोबाईल वर काही ना काही बघायचं लागलेली सवय तशी जाणे अवघडच! प्रत्येक गोष्टीचे टप्पे असतात, कदाचित पहिल्या काही टप्प्यामध्ये मन विचलित होईल, चंचल मन त्या छोट्या dopamine hits साठी थोडे अस्वस्थ देखील होईल. हळू हळु स्थित प्रज्ञतेच्या दिशेने जात त्याची जागा एखादी चांगली सवय घेईल. अनेक वर्षांमध्ये अंगवळणी पडलेल्या सवयी अशा रात्रीत कशा सुटतील? पण कशासाठी हा अट्टाहास, कशासाठी हे प्रयोग, याचे उत्तर एकच, कधीतरी या vicious cycle मधून बाहेर पडावे लागेल ना! आपला निर्धास्त झालेला attention span, वैचारिक क्षमता, यांचा कधीतरी विस्तार करावा लागेलच ना, विशेषतः सर्जनशील विचार करण्याची सर्वाधिक गरज आहे अशा AI च्या नवीन जगात! #SocialMedia #AI #०१:०९:२०२५::११:५४:am

Tags: #marathi, #digital wellbeing, #ai, #स्थितप्रज्ञ