#१३४६ खंडेराव, मनातली वादळे शांत करण्याचे सामर्थ्य प्रगल्भ निश्चयाम…
- Posted
- 2025-10-10
- Type
- text
#१३४६ खंडेराव, मनातली वादळे शांत करण्याचे सामर्थ्य प्रगल्भ निश्चयामध्ये असते. परिस्थिनुरूप उठणारी ही वादळे कधी उथळ तर कधी खोल असतात. काही काळासाठी रोखणे केव्हाही सोपे, पण त्याचा समूळ नाश करायचा असेल तर खोल मनाचा ठाव घ्यावा लागतो. उंच आकाशात भरारी घेणाऱ्या सैरभैर मनाला शांत करावे लागते. प्रयत्नांती जेव्हा स्थिर मन अविचलपणे त्याचा मागोवा घेते, तेव्हा प्रश्न सुटतो. तसं पाहिलं तर मनाला मोट लागते, ज्याच्या भोवती मन संचार करेल. ही मनाची मोट शोधणे तसे अवघड, यात मानसिक, शारीरिक कष्ट असले आणि हे तुलनेने कठिण असले तरी या मार्गाने केलेला उपाय नक्कीच परिणामकारक ठरतो! शांत, स्थितप्रज्ञ मन भौतिक आणि डिजिटल जगात वावरताना बंधनांना झुगारत नाही. अढळ निश्चयाने त्यावर चालत राहील! त्यामुळं तू आपल चालत रहा, बंधनांना झुगारू नको, तो अढळ ध्रुवतारा जरी दूर असला, तरी त्याकडे चालत रहा. कधी मागे वळून पाहशील तर, स्वतः पार केलेले अंतर पाहून मन पुनःप्रफुल्लीत होईल! बाकी स्थितप्रज्ञतेचा ध्यास घे! #मन #वादळे #१०:१०:२०२५::०७:४६:pm
Tags: #खंडेराव, #मन, #स्थितप्रज्ञ, #marathi