#१३४७ #Book Review वॉल्डन: हेन्री डेव्हिड थोरो जयंत कुलकर्णी यांनी …
- Posted
- 2025-10-10
- Type
- photo
#१३४७ #Book Review वॉल्डन: हेन्री डेव्हिड थोरो जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक खरंच खूप सुंदर आहे! मानवी जीवन, निसर्ग, भाव भावना, प्राणी, पक्षी, कीटक, सर्व कसे जोडले गेले आहेत आणि निसर्गाशी जोडून कसं राहता येईल याच्या विषयी यात वर्णन आहे. लेखन एक तळ्याच्या किनाऱ्यावर राहायला जातो. तेथे अत्यल्प साधनांमध्ये घर बांधतो. तेथे शेती करतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वसंत ऋतू, इ. ऋतुंमध्ये वाल्डनचे तळे तसेच आसपासच्या तळ्यांचे वर्णन करतो. तेथे भेटलेली बहुरंगी माणसे, अनुभवलेले प्राणी पक्षी, सर्व काही असे वर्णिलेले आहे की वाचकाच्या मन पटलावर वॉल्डनचे तैलचित्र नक्कीच उमटते, किंबहुना तो वाचक लिलया स्थळ, काळ आणि गोष्टीच्या मर्यादा ओलांडून जणू काही ते स्वतः जगत आहे अस वाटत. निसर्ग सर्व काही देतो, ते पाहता आला पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. स्वतः कसे जगत आहोत, याचा विचार करण्यास प्रवृत करून, निसर्गाकडे पाहण्याची एक दृष्टी तुम्हाला हे पुस्तक नक्की देईल. खंडेराव जस आयुष्याचा पट मांडतो तसा येथे एका तळ्याच्या माध्यमातून लेखकाने समर्पक जीवनाविषयी एक पटकथाच उलगडली आहे अस म्हटलं तर वावग ठरणार नाही! सर्वांनी विशेषतः तरुणांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक! #१०:१०:२०२५::०७:५२:pm
Tags: #book review, #marathi