Sanket Tambare

← Micro Blog

#1369 नेमाडेंचे “हिंदू” वाचल्यावर, खंडेरावच्या मनातील द्वंद्व किती …

Posted
2026-02-05
Type
photo

#1369 नेमाडेंचे “हिंदू” वाचल्यावर, खंडेरावच्या मनातील द्वंद्व किती प्रगल्भ पण टिकतेच उलगडलेले होते, याची थोडी कल्पना येते. एका बाजूला वारसाहक्काने आलेलं गावातले स्थान आणि दुसऱ्या बाजूला अनुभवातून स्वतःला प्रगल्भ करू पाहणारे एक उत्साही मन!🤍 बंधनं तशी भरपूर पण त्यांना झुगारून नवी क्षितिजे पाहण्यास उत्सुक मन, एक वेगळीच आशा बाळगून भारावून जगणारा खंडेराव!🤹 काय हवे आहे त्यापेक्षा काय नको आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांना जगून पाहणारा तो हळूहळू स्थैर्याकडे जातो!🧘‍♂️ खोल मनातील एक एक पदर उलगडत आपल्याच मनातल्या खोल डोहात कधीतरी रमत, वेगवेगळे अंतरंग जणू काही तो आयुष्याच्या या canvas वर रंगवत असतो!🫟 सुरुवातीला अंधुक वाटणारे ते चित्र हळूहळू आपले अंतरंग खुलवते! शेवटी तो सुंदर, विस्तृत, प्रगल्भ पट पाहिला की आपणच हा पट रंगवला का, हा प्रश्न या मनास पडतो!🖼️ या सर्वात महत्वाचे ठरते, या चित्राला रंगवणारे मनातले स्थैर्य, शांतता, संयम आणि या प्रक्रियेवरील विश्वास!❣️ बाकी गोष्टी सोप्याच असतात, दुरून फक्त कधी कधी त्या क्लिष्ट आणि खोचक वाटतात इतकेच!❤️ #५:०२:२०२६::११:४७:am

Tags: #खंडेराव, #marathi, #book review, #fiction