Sanket Tambare

← Micro Blog

#१३७० #खंडेराव_उवाच निवडणुका आता बदलल्या आहेत. राजकारण, समाजकारण आत…

Posted
2026-02-09
Type
text

#१३७० #खंडेराव_उवाच निवडणुका आता बदलल्या आहेत. राजकारण, समाजकारण आता अर्थकारणामध्ये बदलल आहे. Freebies, पैसा, मद्य याच्या जोरावर सर्व खेळ सुरू आहे! समृद्ध पश्चिम महाराष्ट्र आणि तुलनेने कमी प्रगत मराठवाडा पाहिला की ते प्रकर्षाने जाणवते! एका गावात एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करोडो रुपये येत असतील आणि त्या गावात रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव असेल. तरीही जर तेथे निवडणुकीमध्ये पैसाच वरचढ ठरत असेल, तर त्या गावाला विकासाचा अधिकारच नाही असे म्हटले तर वावग ठरणार नाही! अहो ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचे संपूर्ण बजेट आणि या निवडणुकीत मिळून होणारा सर्व खर्च पाहिला, दोन्ही पारडी सारखीच ठरत असतील तर, ही शोकांतिका नाही का! इथे बँकेत जमा झालेल्या व्याजावर पण income tax भरावा लागतो आणि तिथे करोडो रुपये असेच या व्यवस्थेमध्ये फिरत असतील तर या व्यवस्थेवर विश्वास कसा राहिल? बाकी, तू तुझे पाहून घे, शिकत रहा, एका जागी अडकू नकोस; जग खूप मोठं आहे, तू तुझी भ्रमंती थांबवू नकोस! #०९:०२:२०२६::०८:४३:pm

Tags: #खंडेराव, #politics, #marathi, #maharashtra