#१३७३ #खंडेराव_उवाच आयुष्यात माणूस जेवढ्या गोष्टी अनुभवतो, वेगवेगळी…
- Posted
- 2026-02-11
- Type
- text
#१३७३ #खंडेराव_उवाच आयुष्यात माणूस जेवढ्या गोष्टी अनुभवतो, वेगवेगळी आयुष्य जवळून बघतो, तेवढं आपल्या आजच्या निर्णयाचा, उद्या किंबहुना येणाऱ्या आयुष्यात होणाऱ्या परिणामांचा, विचार तो करू शकतो! धावणं/ कोणताही व्यायाम तसा शरीरासाठी चांगला! मग ते १०-१२ किमी असत तर ठीक होते, पण ५० किमी वगैरे पळण्याचा माझा अट्टाहास का याचा विचार करत होतो! रोज स्वतःसोबत १-१.५ तास मिळतो ही जमेची बाजू, पण ५-६ तास सलग पळत राहणं, यातून एक वेगळीच अनुभूती, ऊर्जा मिळते! “I am enough for me and I can conquer whatever I decide to” कदाचित या विचार त्यामागे आहे! पण त्यामुळे इतर गोष्टीही अगदी समर्पकपणे चालू आहेत, काम, लिहीन, वाचन, ब्लॉगिंग, AI , वगैरे, वगैरे! सोशल मीडिया वरून बाहेर पडल्यावर एकट्या मनाला काहीतरी विसावा हवा. सतत काहीतरी पाहत, ऐकत, मिळत राहणारे dopamine hits इतक्या सहज कस बर सुटतील! कदाचित त्याच्यावर running हा उपाय असावा, स्वतःला कशा मध्येतरी गुंतवण, त्यातून होणारा बाकी शारीरिक, बौद्धिक, मानसिक फायदा वेगळाच! बाकी, ही आयुष्याची कोडी सोडवायला तुला या आभासी सोशल मीडियाच्या बाहेर पडावं लागेल, एवढ मात्र नक्की, नाहीतर या प्रवाहात तू कधी वाहत गेलास, हे तुला समजणं तसे अवघडच होईल! #११:०२:२०२६::०९:२५:pm
Tags: #खंडेराव, #running, #marathi, #digital wellbeing