#1375 #खंडेराव_उवाच✍️ खंडराव, उलगडलेले आयुष्य उमजण्यासाठी जरा बाहेर…
- Posted
- 2026-02-28
- Type
- text
#1375 #खंडेराव_उवाच✍️ खंडराव, उलगडलेले आयुष्य उमजण्यासाठी जरा बाहेर पडुन भटकंती केली की मन मोकळं होत.✨ आपण जे काही अनुभवतो त्याचे आकलन चालूच असते. पण सखोल समग्र चित्र पाहायला मोकळं मनच लागतं.🖼️ शहराच्या कल्लोळात कुठेतरी टेकडीवर ते थोडफार होत पण खरी मजा तर निसर्गात रमण्यातच आहे.🏕️ मग विचारांच चक्र चालू होते.🤔 मी काय करावे, काय करू नये, का करावे, हे केल्यावर नक्की काय होईल अशा अनेक प्रश्नांची उकल चालू होते.😀 हळूहळू नकळत तुम्ही शांत होता. मनातला कल्लोळ थांबतो. चंचल मन मग समोरच्या दृश्यामध्ये रमून जाते. मग ते समुद्राच्या लाटा असो, विस्तीर्ण नदीपात्र, रांगडा सह्याद्री किंवा शांत निसर्ग!🧘♂️ मन एकरूप होते, शांत होते, न सुटलेले प्रश्न सुटतात, गोष्टी दृढ होतात आणि पुन्हा त्या कल्लोळमध्ये स्थितप्रज्ञ होण्यास तुम्ही तयार होता!❣️ याची जाणीव असणं, स्वतः वर स्वतः चा कंट्रोल असणं, हे सर्व करायला मिळणे यातच खरं स्वातंत्य आहे असं वाटतं!❤️ बाकी तू कधीतरी अस राहून तरी बघ, तांत्रिक जगामध्ये अडकून त्यात हरवण्यापेक्षा आपणच आपल्या मनाच्या खोल डोहात जाऊन त्याचा मागोवा घेण्यात एक वेगळीच मजा आहे, हे मात्र नक्की!🤍 #२८:०२:२०२६::१२:४७:am
Tags: #खंडेराव, #marathi, #calmness, #स्थितप्रज्ञ