#१३७७ #खंडेराव_उवाच खंडेराव, एखादी गोष्ट परफेक्टली करण्याविषयी एक इ…
- Posted
- 2026-03-13
- Type
- text
#१३७७ #खंडेराव_उवाच खंडेराव, एखादी गोष्ट परफेक्टली करण्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.🤹🏻 काही लोक साधे पणाने राहतात , काही सतत काहीतरी करत असतात तर बहुतांश लोक हे रोजचे काम, सामाजिक बंधन आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये इतके गुंततात की गेलेला वेळ, दिवस, महिने, वर्ष कधी कळतच नाही.🧑💻 मागे वळून पाहिले तर आपण या काळात नेमकं काय केलं याचं उत्तर कधीच भेटत नाही.🫣 यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करावं?🤔 आपला असा एखादा zone शोधावा, ज्यात तुम्ही सर्व काही व्यवस्थित करत आहात, तुम्ही शांत आहात, स्वतःसोबत वेळ घालवत आहात, प्रश्नांपासून न पळता, त्यांना खरंच सोडवत आहात, निसर्गात थोड निवांत फिरत आहात!✨ हे असंच काहीस focused लोक करत असतील बहुदा!💫 बाकी, तू तुझे पाहून घे, या बंधनामध्ये अडकू नकोस, मुक्त वावर कर, मुक्त आकाशात भरारी घे!🤍 #१३:०३:२०२६::०९:३७:am
Tags: #खंडेराव, #marathi, #social media