#१३८० #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्यात रोजच काही exciting होईल असं न…
- Posted
- 2026-03-23
- Type
- text
#१३८० #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्यात रोजच काही exciting होईल असं नाही. बहुदा, तुम्ही एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची, घटनेची वाट पाहत असता. कदाचित तुमच्या धैर्याची ती परीक्षा असते. अशावेळी एका जागी शांत बसून राहायला आवडतं. तुम्ही शांत होता. आजूबाजूच्या घटकांचा, व्यक्तींचा, तुमच्या निर्णयांचा विचार करता. हे सगळं करताना एक गोष्ट असते, या सगळ्याच्या शेवटी काहीतरी चांगले होईल, असा विश्वास असतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक वेगळीच मजा आहे, हेही तितकेच खरे! बाकी, हे सर्व होत राहीलच, तू तुझा स्थितप्रज्ञतेचा प्रवास चालु ठेव आणि या प्रक्रियेवर विश्वास ठेव इतकच! #२३:०३:२०२६::१०:३४:pm
Tags: #खंडेराव, #marathi, #स्थितप्रज्ञ, #calmness