#१३८३ #खंडेराव_उवाच✨ खंडेराव, माणसाला शहाणपणाची एक वेगळीच किंमत मोज…
- Posted
- 2026-04-02
- Type
- text
#१३८३ #खंडेराव_उवाच✨ खंडेराव, माणसाला शहाणपणाची एक वेगळीच किंमत मोजावी लागते.😌 खरंतर काळ हीच त्याची खरी कसोटी.⌛ आजचा माझा निर्णय, कितपत शहाणपणाचा आहे, हे तसे आज कळत नाहीच, पण तो किती चांगला असू शकतो, याची थोडीफार कल्पना असतेच!💫 तुमची संगत, तुमच्या अशा शहाणपणाच्या निर्णयावर नक्कीच परिणाम करते.💯 यात धैर्य आणि एखाद्या व्यक्ती/ प्रक्रियेवरील विश्वास जास्त महत्वाचा असतो हे मात्र नक्की.😇 बाकी, हे शहाणपण मिळवण्यासाठी तू प्रयत्न करत असशीलच, याविषयी शंका नाही.❣️ फक्त काळाच्या परिघावर त्या निर्णयांची, व्यक्तीची, गोष्टींची तुलना कर; पुढील आव्हाने थोडी हलकी होतील!🤍 हे शहाणपण कालानुरूप येतेच, फक्त ते ओळखण्यासाठी थोडे प्रयत्न नक्कीच करावे लागतील, एवढंच!❤️ #०२:०४:२०२६::०८:४३:pm
Tags: #खंडेराव, #marathi, #philosophy