#१३८५ #खंडेराव_उवाच🌱 खंडेराव, मनातले अंतरंग उलगडणं तितकं सोपे नाही…
- Posted
- 2026-04-20
- Type
- photo
#१३८५ #खंडेराव_उवाच🌱 खंडेराव, मनातले अंतरंग उलगडणं तितकं सोपे नाही. प्रत्येकाचे आपले निर्णय (choices) असतात, प्रत्येकजण आपल्या मर्यादा कळत नकळत आखत असत. उंच आकाशात भरारी घेऊन आकाश कवेत घेणारे पक्षीदेखील कुठेदेखील बसतात, हे जरी खरे असले तरी, त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीची आणि स्वतःच्या आवाक्याचा विचार करून तो निर्णय घेतलेला असतो! प्रश्न आहे, आपण किती उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजात विविध स्तर असतात, त्याला शहरी, ग्रामीण, सामाजिक, आर्थिक असे बरेच कंगोरे असतात, एखाद्याला वरच्या स्तरात जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पारंपरिक साच्याच्या बाहेर जाऊन, गोष्टी अनुभवाव्या लागतात. शाळा, कॉलेज, इ. ठिकाणी आपले सहकारी आपला आवाका ठरवतात खरा, पण प्रयत्न केला तर त्याच्या पलीकडे डोकावण्याची एक प्रेरणा सगळ्यांमध्ये असतेच, गरज आहे फक्त तिला ओळखण्याची! कधीकाळी जवळच्या वाटणाऱ्या लोकांचे अंतरंग पाहिले की एक प्रश्न नक्की मनात येतो, खरंच या प्रक्रियेमध्ये मी स्वतःची ऊर्जा, वेळ, विचार गुंतवण कितपत योग्य आहे. भूतकाळात केलं म्हणून आज करणं, खरंच गरजेचं आहे का? यामुळे एखादा व्यक्ती एकांतात नक्कीच जाईल, पण तो त्याच्या मनाच्या खोल डोहातच जातोय ना, आणि बाकी लोक आहेतच ना? तू आपला निवांत राहा, AI, मानवी भावना, स्वप्नांमध्ये गुंतून जा, ज्याला यायचे आहे, तो येईल! ही वेगळी वाट, चांगल्या सवयी, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक, एके दिवशी नक्कीच उपयोगी ठरते! #२०:०४:२०२६::०८:१९:am