Sanket Tambare

← Micro Blog

#१३८९ #खंडेराव_उवाच खंडेराव, काही प्रश्न सोपे असतात, काही थोडे किचक…

Posted
2026-04-24
Type
photo

#१३८९ #खंडेराव_उवाच खंडेराव, काही प्रश्न सोपे असतात, काही थोडे किचकट असतात. काहींची उत्तरे सोपी असतात तर काहीना कितीही प्रयत्न केले तरी उत्तर सापडतच नाहीत. मग अशा वेळी मन त्या प्रश्नांपासून पळते, ते सोडून बाकी सर्व करते! तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या आभासी जगात व्यक्ती ओळखणे तसे अवघडच, बाकी चिंता आणि आपले विखुरलेले प्रश्न व आयुष्य आहेच! इंस्टाग्राम बंद केल्यानंतर काही गोष्टी जाणवल्या! एखाद्या गोष्ट, प्रश्न, खरंच आहे का, याचा विचार करताना जाणवते, या equation मधून सोशल मीडियाच काढले तर, किती चांगल्या गोष्टी होतील ना? एखादी गोष्ट, जागा, क्षण कॅमेरामध्ये कैद करून त्याला टाकण्यापेक्षा तुम्ही त्या क्षणाला मनात ठेवाल; निवांत क्षणी शांत राहून मनाला थोडा आराम द्याल, सतत काहीतरी ऐकत बसण्यापेक्षा थोडसं स्वतःमध्ये हरवाल, पुस्तक वाचन, निसर्गात भटकणं हे तर होईलच! पण महत्वाचे म्हणजे, काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न तरी कराल! यामध्ये सर्वांपासून तुटण्याचा धोका आहेच, पण खरा प्रश्न हा आहे, हे खरंच तितकं प्रभावी, उपयोगी आहे? तर, नक्कीच आहे! बाकी तू, सोशल मीडिया मध्ये न गुंतता, मनाचा मागोवा घे. प्रयत्न करत राहा. शांत, निरभ्र, समंजस, स्वतः आहे तसं वागणार कोणीतरी इतक्या सहज कसं भेटेल? #२४:०४:२०२६::१२:१०:am

Tags: #खंडेराव, #marathi, #social media, #digital detox