Sanket Tambare

← Micro Blog

#१३९० 🌊 बंधन झुगारून मुक्तपणे संचार करणारे 🕊️, क्षितिजाच्या आवाक्…

Posted
2026-04-24
Type
photo

#१३९० 🌊 बंधन झुगारून मुक्तपणे संचार करणारे 🕊️, क्षितिजाच्या आवाक्यात वावरणारे पक्षी पाहिले 🌅, की आपण स्वतःभोवती निर्मिलेल्या बंधनांची जाणीव होते. 🔗 कालानुरूप काही गोष्टी “केल्याच पाहिजेत” असा दंडक पडतो 📋 — जसे की कुठे गेले तर त्याचा आढावा सगळ्यांसाठी टाकणं 📸, किंबहुना सर्वजण काय आणि कुठे करत आहेत, याची माहिती ठेवणं! 📱 कदाचित त्या सर्वांचा परिपाक म्हणून — व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या बंधनांमध्ये अडकतो! 🕸️ खरं सुख म्हणजे काय, खरी मजा म्हणजे काय — याच्या इतरांच्या व्याख्यांमध्ये अडकून राहतो 🌀; स्वतः काहीतरी ठरवायचं असतं, याची बहुदा जाणीवच नसते! 😶‍🌫️ शांत किनारी, येणाऱ्या लाटांकडे पाहत बसलं 🌊, की नेमकं काय महत्त्वाचं — हे जाणवतं. 💫 बंधन दिसतात 🔗, व्यक्ती दिसतात 👥, आपलेच निर्णय दिसतात 🎯, मागे पडलेले मित्र दिसतात 👣, भविष्याची चाहूल दिसते 🌠, उद्याच्या परिणामांची तीव्रता दिसते ⚡, आणि आपली एक वेगळीच वाट पडत आहे — हेदेखील दिसतं! 🛤️ आणि काही क्षणांनंतर — सगळं शून्यात विलीन होऊन 🌌, फक्त समुद्राच्या लाटा आणि त्यांचा आवाज उरतो 🌊🔊; बंधनातून मुक्त झालेलं मन दिसतं 🕊️ — आणि या सगळ्यात कधीतरी विखुरलेलं मन आता अगदी साधं, सोपं, निर्मळ होतं. ✨ पुन्हा नव्या क्षितिजाला पाहण्यास मन उत्सुक होतं! 🌅🌱 #२४:०४:२०२६::०७:५४:pm

Tags: #marathi, #self-reflection, #social media