Sanket Tambare

← Micro Blog

#१३९१ #खंडेराव_उवाच खंडेराव, कधीतरी आपण अशा एखाद्या टप्यावर पोहचतो,…

Posted
2026-04-27
Type
text

#१३९१ #खंडेराव_उवाच खंडेराव, कधीतरी आपण अशा एखाद्या टप्यावर पोहचतो, जेव्हा जवळपास सर्व गोष्टी स्पष्ट दिसतात. भूतकाळातील निर्णय दिसतात, सद्य स्थितीतील द्वंद्व, प्रसंग, ideology, निर्णय, त्याचं चूक बरोबर असणं असं सर्व काही दिसत, भविष्यातील शक्यता आणि काय होईल याची अंतर्गत कारणमिमांसा देखील होते. कदाचित हे existential crisis वाटू शकत, पण हे तसं तर नक्कीच नाही. बहुदा, काहीतरी वेगळं आणि वेगळ्या प्रकारे करण्याच्या हेतूने हे होत असावे. आता यात एक तुलनेने थोडा अवघड प्रश्न आहे लोक, मित्र वगैरेंचा. व्यक्ती, आवडी-निवडी, स्वभाव, श्रद्धा, अंधश्रद्धा, ईच्छा- आकांक्षा, स्वप्न इ. मध्ये त्याच्या गुंत्यात कधीतरी माणूस अडकतो. अशात त्याला काही खरच interesting काम करणारे लोक भेटले, की द्वंद्व कमी होतात, आपल्याला जे आवडते ते करत रहावं हेच खरं हे कळत. वेळ, व्यक्ती आणि ईच्छा यांच्यात अडकून त्याला बॅलन्स करणं त्याला जमू लागत. काहीतरी करण्यासाठी काहीतरी सतत निरागस मनाने करत राहणं महत्त्वाचं हे त्याला कळतं. तसं, सोशल मीडिया सोडून दिल्यामुळे कदाचित स्वतः मध्ये हरवलो असेल देखीलही. बाकी, तू तुझे काम करत आहे, मानवी, सामाजिक बंधनात न अडकता मुक्त संचार कर, जो असेल तो येईलच! #२७:०४:२०२६::११:१०:pm

Tags: #खंडेराव, #marathi, #self-reflection