Sanket Tambare

← Micro Blog

#१३९३ खंडेराव, कधीतरी माणूसखोल गर्तेत अडकतो, गोष्टी मनाप्रमाणे होत …

Posted
2026-05-04
Type
text

#१३९३ खंडेराव, कधीतरी माणूसखोल गर्तेत अडकतो, गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत, अपेक्षाभंगच जास्त होतो, सदैव सैरभैर भटकणारे चंचल मन अस्थिर होते, आकाशाचा मागोवा घेण्याच्या प्रयत्न करणारे मन हरवून जाते. मग अशा वेळी, आपण नेमक कुठून आलो आणि कुठे जायचे आहे, याची जाणीव झाली, की गोष्टी सोप्या होतात. Temporary कोण आणि permanent कोण याचा मागोवा मन घेते. खरंतर त्याच्यातल्या गफलतीमुळेच कदाचित सगळी गणित चुकतात. एकदा का हा canvas रिकामा झाला, की मुक्तपणे संचार करणारे मन, त्यात नवनवीन रंग भरून, एक सुंदर तैलचित्र बनवतेच! फक्त गरज असते, काही काळ, त्यावर स्थिर राहण्याची! बाकी, वेळ आणि काळ हाच मोठा शिक्षक, त्याने एकदा शिकवलेल्या गोष्टी विसरलास तर जास्त गुंतत जाशील! तेवढं मात्र बघ! #०४:०५:२०२६::११:५८:pm

Tags: #खंडेराव, #marathi, #self-reflection