#1400 #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्य सोपच असतं, आपणच त्याला क्लिष्ट …
- Posted
- 2026-05-19
- Type
- photo
#1400 #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्य सोपच असतं, आपणच त्याला क्लिष्ट करून ठेवतो.🙂 आभासी जग आणि खरे जग, आभासी विश्वातले मित्र आणि खरंच काळजी करणारे मित्र यामध्ये तसा बराच फरक!✨ तसा मनाचा गुंता हा किचकटच, पण एकदा का आपला साचा ठरला की बाकी थोड सोपं नक्कीच होते!💭 हा मनाच्या खोल डोहात घेऊन जाणारा एकट्याचा, कंटाळवाण, स्वतःच्या मूलभूत सवयी बदलणारा प्रवास तसा सुंदरच!🤍 हेवा, मत्सर, आपुलकी, प्रेम, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य या आणि अशा अनेक बंधनातून मुक्त होऊन चालता राहता येत.✨ एखाद्या कलेचा, आवडीचा, छंदाचा एवढा व्यासंग व्हावा की त्यासाठी स्वतःला त्यात झोकून द्यावे!❣️ एवढं अलिप्त राहणं मानवी प्रवृत्तीच्या विरुद्ध असल तरी, याशिवाय स्थितप्रज्ञतेच्या त्या पायरीवर पोहचणे तसे अवघडच!😌 तू मात्र, हा व्यासंग जप, त्यात स्वतःला इतक गुंतव की बाकी काहीही या मनाला अविचल करणार नाही!🌱 #१९:०५:२०२६:१०:२१:pm
Tags: #खंडेराव, #marathi, #स्थितप्रज्ञ, #social media