#१४०१ #खंडेराव_उवाच खंडेराव, वेळ, मन, शरीर आणि विचार याच्यावर नियंत…
- Posted
- 2026-05-20
- Type
- photo
#१४०१ #खंडेराव_उवाच खंडेराव, वेळ, मन, शरीर आणि विचार याच्यावर नियंत्रण मिळवणे तसे कठीणच, पण हे शक्य तर नक्कीच आहे.✨ वर्तमानाच्या पलीकडे जाऊन उद्याचा मागोवा घेत गोष्टी करणे तसे अवघड.🏞️ वेळ ही तशी इंटरेस्टिंग गोष्ट नक्कीच आहे. ती कधी हळू जाते, कधी गेलेली कळत नाही तर कधी भूतकाळाचा अंदाज घेताना, वर्ष कधी संपली हे देखील कळत नाही.🕰️ विचारांना आवरणे तसे तुलनेने सोपे, थोडे प्रयत्न केले की ते होते.💭 शरीरासाठी, त्याच्या आरोग्यासाठी, मग ते शारीरिक असो, मानसिक असो वा बौद्धिक; सातत्यपूर्ण काही करत राहील की, ते निरोगी राहत.🏃🧘🧍 शेवटी, प्रत्येकाला एक चॉइस नक्कीच असतो, गरज आहे त्याची जाणीव होण्याची!🤹 हे सर्व झाले की मग हा आयुष्याचा कॅनव्हास थोडा स्वच्छ होतो, माणसे कळतात, आपल कोण, परक कोण, कशात गुंतावे, कशामध्ये गुंतू नये; हे सगळं कळत!🎨 बाकी, वेळ सर्व काही शिकवतोच, फक्त तू त्यातून किती शिकलास हे महत्वाच! जेवढ्या लवकर हे ओळखशील तेवढं चांगलं!🌱 #२०:०५:२०२६::०८:५२:am
Tags: #खंडेराव, #marathi, #personaldevelopment