Sanket Tambare

← Micro Blog

#१४०५ #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्याच्या पटलावरील आपल्याकडे पाहिले …

Posted
2026-05-25
Type
photo

#१४०५ #खंडेराव_उवाच खंडेराव, आयुष्याच्या पटलावरील आपल्याकडे पाहिले की, कधी काही माणसे खरच कधी जवळची होती का असा प्रश्न पडण तसं साहजिकच!💭 खरंतर, एकदा याचा थोडादेखील संशय आला तर, नंतर समर्पित भावनेने त्या व्यक्तीशी जोडणे तसे कठीणच!☹️ तसं तर प्रत्येकाचा एक वेगळाच रस्ता, काही वेळा काही काळासाठी हा थोडा जवळ येतो, एवढं सोपे आहे हे जाणवणं!🏞️ वेगळी वाट तुडवताना, नवीन लोक भेटतात, मग मागे सुटलेल्या जुन्या लोकांचा विचार करण्याची खरच गरज आहे का?🫣 याला अडसर असेल, आभासी जगात असलेले बंध, ते जग तू केव्हाच सोडले आहेस, त्यामुळे त्या बंधनाचे ओझेदेखील तू सोडले आहेस, हे मात्र नक्की!🌍 नव्या क्षितिजाचा मागोवा घेत पुढे जाणं तितकंच मार्मिक आणि तात्कालिक वाटतं!🕰️ प्रामाणिकपणे, तत्वाने, सतत, एखादी गोष्ट करत राहिलं की आपसुकच त्याची व्याप्ती एवढा वाढते की, सर्वकाही अशक्य वाटतं! एकदा हे अनुभवल की व्यक्ती, आपल्या मार्गाने चालत राहतो.🌱 त्रयस्थपणे केलेल स्वतःच निरक्षण, त्याला बळ देत राहत!🤍 बाकी, या जाणिवांच्या पलीकडे तू गेला असशील एवढं नक्की. फक्त गरज आहे अकारण एखाद्या जुन्या आठवणी, व्यक्ती आणि त्यांच्या मार्गात न अडकण्याची!✨ #२५:०५:२०२६::१०:३९:pm

Tags: #खंडेराव, #marathi, #social media