#१४०७ खंडेराव, मराठीमध्ये काही खुप चित्तवेधक शब्द आहेत.🪄 त्यातलेच …
- Posted
- 2026-05-28
- Type
- photo
#१४०७ खंडेराव, मराठीमध्ये काही खुप चित्तवेधक शब्द आहेत.🪄 त्यातलेच काही: प्रारूप, प्रयोजन आणि अन्वयार्थ!💭 तटस्थपणे स्वतःकडे पाहताना, त्याचे प्रारूप दिसते!🤹 त्यात कधीतरी या सर्वांचे प्रयोजन काय असा प्रश्न एखाद्याला नक्की पडतो, आज नाही तर उद्या? इंग्रजीमध्ये याला “Existential Crisis” असं काहीतरी म्हणतात.🤠 बरं, असा प्रश्न पडला, पुढे काय?🤔 एकतर रोजच्या पळापळीमध्ये त्याकडे दुर्लक्ष करता येईल किंवा त्याचे खरच उत्तर शोधावे लागते! 🤍 जेवढ्या लवकर हा व्यासंग सुरू होईल, तितकेच लवकर काही गोष्टी कळतात!🙂↕️ आपल्या आकांक्षा, इच्छा, स्वप्ने, आवडीनिवडी, निर्णय आणि सर्वात महत्त्वाचे विचार हे आपण ज्या गोष्टी पाहतो, ऐकतो आणि समजून घेतो, हे सर्व ठरवतं!📖 महत्वाचे ठरते, त्यातला नेमका कोणता अन्वयार्थ तुम्ही निवडता!✨ समाज माध्यमांमध्ये गुंतून हे असं कधी उलगडत नाही, त्यामध्ये स्वतः मध्ये हरवणे, समाजाला सतत एका विश्लेषणात्मक दृष्टीने पाहणे, हे सर्व आलच!💯 बाकी, प्रारूप जाणून, त्याचा अन्वयार्थ शोध! आयुष्याच्या प्रयोजनाचे क्षितिज मग नक्कीच दिसेल! 🌱 #२८:०५:२०२६::०६:४५:pm
Tags: #खंडेराव, #marathi, #philosophy, #social media