Sanket Tambare

← Micro Blog

#१४१०💯 खंडेराव,❣️ तसं पाहिलं तर, मानवी मन, आकांक्षा, इच्छा, अपेक्ष…

Posted
2026-06-05
Type
photo

#१४१०💯 खंडेराव,❣️ तसं पाहिलं तर, मानवी मन, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा यांच्यामध्ये इतके गुंतून जाते की त्या साच्याच्या पलीकडे काही आहे याची त्याला जाणीवंच राहत नाही!💫 अल्बर्ट एलिसच्या म्हणण्याप्रमाणे अपेक्षा न ठेवता जगलं तर सर्व कस सोपं होते!🙂 बहुतांश वेळेला व्यक्ती, संस्था यांचा दिसतो तसा चेहरा नक्कीच नसतो!🫣 एखाद्या ठिकाणी समर्पित भावनेने आपण केलेले काम, तत्कालीन नक्कीच उपयोगी ठरते!✨ पण कालांतराने येणारे अनुभव व्यक्तीचे खरे अंतरंग दाखवतात!🤹 शेवटी, आपल कोण, परक कोण, महत्त्वाचे काय आणि महत्वाचे काय नाही, हे काळच चांगलं शिकवतो!🕰️ पण जर या सोशल मीडियाच्या आभासी जगातून सुटलो, तर मग प्रश्नच संपतो, ना ते फोटो पाहणं, ना कोणती स्टोरी पाहणं, फक्त आपण आपलं जगत राहण!🤍 नवीन व्यक्ती भेटत राहतातच, त्यात काय अवघड नाही; गरज आहे मागचे कधी सोडायचे, हे कळण्याची! 🌱 बाकी, मुक्त संचार करणाऱ्या मनाला, पंखात बळ देण्याचं काम करत राहा! ही वाट नक्कीच अवघड आहे, पण सोपी असेल असा कोण म्हटलं होत म्हणा!❤️ #०५:०६:२०२६::११:२८:pm⏲️

Tags: #खंडेराव, #marathi, #psychology, #social media