Sanket Tambare

← Micro Blog

#1417 #एकांत असा एकांत भेटला की माणूस आत मध्ये डोकावतो. त्याला स्वत…

Posted
2026-06-21
Type
quote

#1417 एकांत

#1417 #एकांत असा एकांत भेटला की माणूस आत मध्ये डोकावतो. त्याला स्वतःच्याच एक वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. कधीही न उघडलेले पदर मग तो उलगडतो. द्विधा मनातील द्वंद्व थोडे सोपे होतात. निर्णय, व्यक्ती, जागा यांच्यामधून मोकळे होऊन समोर दिसणाऱ्या निरभ्र आकाशात मन मोकळा संचार करते. आयुष्याच्या पटलावरील आतापर्यंतचा रंगवलेला पट काही क्षणात डोळ्यासमोरून तरळून जातो. पुढील शक्यतांची गोळा बेरीज सुरू होते. असं सर्व काही चालू असताना मन एकदम शांत होतं. निश्चल होतं. त्याला स्थैर्य प्राप्त होते. स्थितप्रज्ञतेच्या दिशेने तो चालू लागतो.

Original post

Tags: #life, #calmness, #marathi, #स्थितप्रज्ञ, #मन