Sanket Tambare

← Micro Blog

#१४२० खंडेराव,💯 भटकंती माणसाला शहाणे करते.🤍 कधी डोंगररांगा, कधी स…

Posted
2026-06-25
Type
text

#१४२० #भटकंती #खंडेराव

#१४२० खंडेराव,💯 भटकंती माणसाला शहाणे करते.🤍 कधी डोंगररांगा, कधी समुद्र किनारे, कधी क्षितिजापर्यंत पसरलेले पठार, तेथे भेटलेली माणसं, त्याच्यासोबत झालेल्या गप्पा अशा सगळ्याची आयुष्यात सरमिसळ झाली, की आयुष्याच्या परिसीमा विस्तारात.🧭 स्वप्ने विस्तारतात, परीघ विस्तारतो, दिसणाऱ्या क्षितिजाच्या पलीकडे जाऊन मन डोकावू लागतं.🏞️ एक mediocre व्याखेच्या पलीकडे जाऊन आयुष्याची व्याख्या मन करत!✒️ कधी समुद्राला धडकणाऱ्या लाटांकडे बघत तो आयुष्याचा पट रंगवतो, तर कधी उंच डोंगरावरून परिसर न्याहाळत आपले स्वप्न तो रंगवतो!🏖️ सगळ काही चालू असत, पण मन मात्र शांत असतं, सामाजिक माध्यमांच्या (social media) गर्तेत न अडकता तो मुक्त संचार करतो!🚀 शांत, संयमी मन मग आपल्या स्वतः मध्येच स्थिरावत!❣️ समाजातील defaults ची बंधन झुगारून आपल्या मार्गाने तो चालत राहतो!🌄 थोडक्यात, भटक्या भटकंती करत, आपल्या खोल मनाचा मागोवा घेत आयुष्याचे चित्र रंगवत राहतो!🖼️ बाकी तू, मनाला सैल सोड, त्याची भटकंती निरभ्र आकाशात क्षितिजाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊ दे, एक सुंदर चित्र आपोआप बनत राहील!❤️ #२५:०६:२०२६::०२:००:am⏳

Tags: #भटकंती, #खंडेराव, #marathi, #travel