Sanket Tambare

← Micro Blog

#१४२२🎉 खंडेराव,✒️ आयुष्याचा metaview बघण्यासाठी एक bioscope लागतो,…

Posted
2026-07-02
Type
text

#१४२२ #bioscope

#१४२२🎉 खंडेराव,✒️ आयुष्याचा metaview बघण्यासाठी एक bioscope लागतो, अनुभवांच्या समीकरणांमधून तो बनतो! 📽️ कधीतरी गर्दीत हरवून जाणे, कधी निवांत डोंगरांवर बसणे, कधी या सगळ्यांमधून अलिप्त होऊन आपल्याच लयीमध्ये राहणे, एक वेगळी वाट धुंडाळत राहणे, असं काहीसं करत असताना हे क्लिष्ट कोड उलगडत!🏞️ साध्या गोष्टींचे गर्भित अर्थ त्या उलगडलेल्या मनाला दिसू लागतात!🔍 मन, द्विधा अवस्था, शांतता, नाती, आपली आणि परकी माणसं, व्यक्ती आणि कृतीचे प्रयोजन, भावना अशा अनेक complex जाळ्यांमध्ये हे मन अडकून राहत नाही!🧭 अनंत आसमंतात, आपल्याच लयीमध्ये, क्षितिजाच्या पार त्याचा प्रवास सुरू होतो.🚀 मग, मन, शरीर, इच्छा, आकांक्षा, विचार, आचार या सर्वांवर मग हळूहळू नियंत्रण येते!🧘 भटकणारे मन शांत होते, किंबहुना स्थितप्रज्ञ होते.❣️ निसर्गात भटकताना त्याला त्याचे स्थैर्य भेटते आणि मग त्याचा त्याला छंद लागतो!🏞️ बाकी, तू तुझी भटकंती चालू ठेव. निरागस मनाला निरागस माणसे ओळखता येतात, किंबहुना तीच त्याच्या जवळ टिकतात. जी टिकली ती निरागस असे समजून चालत राहा. जी मागे सुटली, ती जाऊदेत!💯 अनादी मन आसमंतात भटकताना त्याला दुसरे असे मन भेटून जाईलच!❤️ #०२:०७:२०२६::११:११:pm

Tags: #life, #bioscope, #भटकंती, #खंडेराव, #marathi