Sanket Tambare

← Micro Blog

#१४२८🎉 खंडेराव,💫 आपण कधीतरी काहीतरी चालू करतो.🤞 स्वतःसाठी ते करत…

Posted
2026-07-12
Type
text

#१४२८ खंडेराव_उवाच

#१४२८🎉 खंडेराव,💫 आपण कधीतरी काहीतरी चालू करतो.🤞 स्वतःसाठी ते करत राहतो.🤔 ते करताना मन मनात मग्न होते, सर्व काही विसरून त्यामध्ये तो गुंतून जातो.🙂‍↕️ मग ते बेधुंद प्रवास असेल, वाचन असेल, लिखाण असेल, पळणे असेल किंवा निसर्गात निवांत रमणे असेल!🧭 स्वतःचा स्वतःशी रोज किमान काही वेळ संवाद होत असेल, स्वतः सोबत हा वेळ घालवत असेल, तर खोल मनामध्ये दडलेले प्रश्न दिसतात आणि सुटतात!🔍 दैनंदिन जगताना, कधीतरी काहीतरी अस्वस्थ करत.🤹 शांत मन विचाराच्या गर्तेत अडकत, अशा वेळी त्या प्रश्नांपासून पळणे हाच एक उपाय सहसा आपल्याला दिसतो!☹️ पण अशा वेळी निवांत निसर्गात केलेली भटकंती असेल किंवा एखादा तास - दीडतास केलेला run यामध्ये मदत करतो.❤️ गुंतलेली कोडी, माणसं, ठरवलेल्या गोष्टी, द्वंद्व यांच्यामध्ये हरवलेल्या मनाला स्थैर्य भेटते.❣️ ते पुन्हा शांत होते, विवेकी होते, स्थितप्रज्ञतेचा त्याला पुन्हा ठाव लागतो!🌱 प्रवाहाविरुद्द जाताना असे द्वंद्व, द्विधा, अस्वस्थता, अपेक्षा सगळं काही आलच!🧘 गरज आहे, यासर्वाच्या पलीकडे दडलेल्या खोल डोहातील मनाला हेरण्याची आणि त्याला मुक्त संचार करण्यासाठी मुक्त करण्याची!🏞️ बाकी, तू तुझे प्रयत्न चालू ठेव. Patience तसा मिळणे/ टिकवणे अवघड, ते लिलया पेलत आहेसच, गरज आहे, अढळ, निश्चल मनाने गोष्टी करत राहण्याची!🤍 #१२:०७:२०२६::१२:१२:am ⏰

Tags: #खंडेराव, #marathi, #स्थितप्रज्ञ, #running