#१४२९ अथांग नभामध्ये मन घिरट्या घेई जेव्हा, खोल डोहाचा माग घेई तेव्…
- Posted
- 2026-07-12
- Type
- text
#१४२९ अथांग मन, शांत डोह आणि स्थितप्रज्ञ मन!
#१४२९ अथांग नभामध्ये मन घिरट्या घेई जेव्हा, खोल डोहाचा माग घेई तेव्हा! घिरट्या घेताना दिसे शांत चित्ती मन याला, खोल डोहातील त्याचे स्थैर्य देई मग हे त्याला! शक्यतांचा घेत आढावा, मग मनी शोधत राही तो विसावा! द्वंद्व तयाचे तोची जाणे जरी, मग याच सर्वांच्या प्रवाहात कसे बरे उत्तर सापडेल तरी! खोल डोह, अथांग सागर सर्वकाही बदलते व्यक्तीपरी, आपण आपले सत्य शोधत राहावे हेच जाणतो हरी! #१२:०७:२०२६::१२:४४:am
Tags: #स्थितप्रज्ञ, #मन, #marathi